Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: निंबाळकर समितीचा चौकशी अहवाल दाबण्याचा खटाटोप

Nimbalkar Report: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारांवर तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची चौकशी समिती स्थापन नेमली गेली.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारांवर तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची चौकशी समिती स्थापन नेमली गेली.

वर्ष होत आले असताना, तसेच पणन संचालकांच्या अहवाल सादर करण्याच्या सूचनेनंतरही अद्याप चौकशी अहवाल गुलस्तात आहे. त्यामुळे अहवाल दाबण्याचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा पणन आणि बाजार समिती आवारात आहे.

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ स्थापन झाल्यावर विविध गैरव्यवहारांची चर्चा बाजार आवारात सुरू झाली. यामध्ये पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा, अतिरिक्त दरांच्या निविदा, अनधिकृत बांधकामे, सेस चोरी आदी विविध गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. एक वर्ष संपत आले तरी अद्याप चौकशी अहवाल गुलदस्तातच आहे.

दरम्यान, ज्यांच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात बाजार समिती येते, त्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.

यामुळे गैरव्यवहार होत असलेल्या विविध घटकांच्या मागणीला बळकटी आली आहे. चौकशी अहवाल आणि बरखास्तीची टांगती तलवार बाजार समिती संचालकांवर असल्याने ‘अधिक’ची कामे करण्यात ते अधिक व्यग्र आणि अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT