IAS Amol Yedge Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Prosperity : शेती समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आवश्‍यक

Team Agrowon

Kolhapur News : ‘देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. शेती समृद्ध करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि योजनांचा अवलंब करायला हवा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे औचित्य साधून आदर्श गोठा पुरस्कारांचे वितरित करण्यात आले. त्या वेळी येडगे बोलत होते. जिल्हाधिकारी येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.

केरबा माने (कौलगे, ता. कागल), सुमित्रा पाटील (बर्सेवाडी, ता. भुदरगड), नंदकुमार साळोखे ( टोप. ता. हातकणंगले), आयुब मुल्ला (लाटवडे, ता. हातकणंगले), कलगोंडा टेळे (सुळकूड, ता. कागल), शरद देवेकर (बर्सेवाडी, ता. भुदरगड) व अजित सौदे (वसगडे, ता. करवीर) या शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. प्रमोद बाबर, डॉ. अशोककुमार पिसाळ, प्रा. अभयकुमार बागडे, तानाजी पाटील, अजय कुलकर्णी, गौरी मठपती उपस्थित होते.

आदर्श गोठा पुरस्कारप्राप्त शेतकरी

गुरुनाथ पाटील (आवळी, ता. राधानगरी), दत्तात्रय पाटील (रा. पेरणोली, ता. आजरा), धनाजी पाटील (बानगे, ता. कागल), संदीप सरनोबत (थेरगाव, ता. शाहूवाडी), सचिन मोरे (संभापूर, ता. हातकणंगले), गुरुनाथ गमाजगोळ (हलकर्णी, ता. गडहिंग्लज), प्रकाश महाडिक (सोनुर्ले, ता. भुदरगड), सुमित परीट (कुरुकली, ता. करवीर), बाबासाहेब पाटील (पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा), बजरंग अंबेकर (मांडुकली, ता. गगनबावडा), अश्‍विनी चौगुले (बस्तवाड, ता. शिरोळ).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

SCROLL FOR NEXT