Groundnut Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Rate : नव्या भुईमुगाचे दर दबावात

Groundnut Market : हमीभाव केंद्रे सुरू करण्याची मागणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Groundnut Production : यवतमाळ ः ‘‘जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे. त्याच वेळी खुल्या बाजारात भुईमुगाचे दर पडले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने त्याची दखल घेत शासनाने भुईमूग खरेदीसाठी तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करावे,’’ अशी मागणी येथील बाजार समितीचे सभापती रवी ढोक, उपसभापती किशोर इंगळे यांनी केली आहे.

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. त्यानुसार केंद्र शासनाने भुईमुगाला ६७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. याउलट बाजारात मात्र ५५०० रुपयांनी हमीभावाचे व्यवहार होत आहेत. हमीभावापेक्षा प्रतिक्‍विंटल तब्बल १२०० रुपये कमी दराने खुल्या बाजारात भुईमुगाची खरेदी होत आहे. एकीकडे उत्पादकता खर्चात वाढ झाली असताना दुसरीकडे कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अशा संकटकाळात शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा पर्याय दिलासादायक ठरेल. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी मार्केटिंग फेडरेशनद्वारे भुईमूग खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत भुईमूग लागवड होत असल्याने प्रत्येक तालुक्‍यांत हमीभाव केंद्राचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी स्तरावर होत आहे.

शेतकऱ्यांचा बाजारातच मुक्‍काम
हंगामातील नव्या भुईमुगाची काढणी जोरात सुरू आहे. परिणामी, बाजारात भुईमुगाची आवक देखील वाढत असल्याने एकाच दिवशी इतक्‍या शेतीमालाचे मोजमाप शक्‍य होत नाही. परिणामी, काही वेळा शेतकऱ्यांवर बाजारातच मुक्‍काम करण्याची वेळ येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT