Chana Wilt Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Wilt Disease : हरभऱ्यावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांपुढे नवे संकट

Agricultural Crisis : हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मर रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मर रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात हिंगोली जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७१९ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे पीक फुलोरा तसेच घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ तसेच इतर तालुक्यांतील हरभरा पिकांवर बुरशीजन्य मर रोगाचा प्राद्रुर्भाव आढळून येतो.

त्यामुळे हरभऱ्याचे उभे पीक वाळून जात आहे. मागील आठवड्यात तुरळक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत होता. परंतु गेल्या काही दिवसांत काही भागात विशेषतः बुरशी नाशकांची प्रक्रिया करून पेरणी न केलेल्या हरभरा पिकांमध्ये मर रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे आढळून येत आहे.

आमच्या भागातील हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मागील दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी पाऊस पडला आहे. मर रोगामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शंकर गुट्टे, बेलुरा, ता. जि. हिंगोली
चार एकर हरभरा फुलोरा अवस्थेत आहे. मर रोगामुळे हरभरा पिकांची मुळ्या काळ्या पडून झाड वाळून जात आहे. साधारणतः ५ ते १० टक्के क्षेत्रावर मर रोग आढळून येत आहे.
काशिनाथ सांगळे, केळी, ता. औंढा नागनाथ,जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT