Fruit Washing Machine  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Washer : नेहरू विद्यालयाच्या फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण ठरले आकर्षण

Fruit Washing Machine : या यंत्रामध्ये फळभाज्या व कंदमुळाचा गाळ, माती साफ होऊन हॅण्डलच्या साहाय्याने ब्रश फिरून फळभाज्या साफ होतात.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व द. गो. वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील आयबीटी विभागाच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले फळभाज्या धुण्याचे यंत्र प्रदर्शनात आकर्षण ठरले.

पाबळ (ता. शिरूर) येथील आयबीटी विज्ञान आश्रम आयोजित टेक्नोव्हेशन प्रदर्शन जे.पी.नाईक सेंटर फॉर एज्युकेशन, कोथरूड-पुणे या ठिकाणी शुक्रवारी (ता. २२) आयोजित केले होते. या प्रदर्शनात राज्यातील ३५ शाळांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांनी आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये एक समस्या सर्व शेतकऱ्यांना होती. ती म्हणजे शेतकरी बीट पिकवतात, पण ते बीट स्वच्छ धुवूनच बाजारामध्ये चांगला हमीभाव भेटतो.

तसेच बीट, मुळा, गाजर, आले यासारखी कंदमुळे धुण्यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना वॉशिंग सेंटर किंवा मग स्वतः हाताने साफ करायला लागत असे. म्हणून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून फळभाज्या धुण्याचे यंत्र तयार केले.

या यंत्रामध्ये फळभाज्या व कंदमुळाचा गाळ, माती साफ होऊन हॅण्डलच्या साहाय्याने ब्रश फिरून फळभाज्या साफ होतात. यंत्र बनविणाऱ्या विद्यार्थांना प्राचार्य कांताराम टाव्हरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयबीटी विभागाचे शिक्षक कल्पना चव्हाण, तेजस्वी दांगट, भावना कहाने, गोरक्ष टाव्हरे आदींनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT