Nitin Gadkari Agrowon
ॲग्रो विशेष

Fisheries : मत्स्य व्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

Fisheries : पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. १८) केले.

महाराष्ट्र पशू मत्स्यविज्ञान विद्यापीठ सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष जैयस्वाल, वसंत खंडेलवाल, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, सहायक आयुक्त रवींद्र वायडा, प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सुरेश भारती, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजक उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘विदर्भातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कोळंबी, शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मामा तलाव व मालगुजारी तलावात झिंगापालन करून मत्स्य व्यवसायामध्ये वाढ करता येईल. खारपाणपट्यात कोळंबी शेती करून मत्स्य व्यवसायाला चालना द्यावी.

शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करण्यावर भर दिल्यास उत्पादनात वाढ होईल. यासाठी ॲक्वा एक्स्चेंज ही यूएसस्थित कंपनीची मदत होईल. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. पूर्व विदर्भात ६ हजार गोड्या पाण्याचे क्षेत्र आहे. पश्‍चिम विदर्भात खारपाणपट्टा आहे. या खाऱ्या पाण्याचा उपयोग करून तेथे निवडक प्रजातींच्या वाढीसाठी मत्स्यपालन क्षमता निर्माण करून कोळंबी क्षेत्र विकसित करता येईल.’’

‘‘मत्स्य व्यवसायासाठी मामा तलाव जिल्हा परिषदेमार्फत ठेक्याने देण्यात आला. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. मत्स्य व्यवसाय उपयुक्त होण्यासाठी या तलावाचे खोलीकरण आवश्यक आहे,’’ असे गडकरी यांनी सांगितले.

‘‘गोड्या पाण्यात ‘झिंगा पालन’ क्षेत्र विकसित करता येईल. पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांतील खारपण पट्ट्यात खाऱ्या पाण्यातील उत्पादन करण्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करता येईल. खोल समुद्रातील मासेमारीसाठी नौका नूतनीकरण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येईल,’’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT