Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : मृद् आरोग्यासाठी कृती आराखड्याची गरज‌

VNMKV Parbhani : डॉ. एस. के. चौधरी : ‘वनामकृवि’त मृद्‍शास्त्रज्ञांच्या परिसंवादाचे उद्‌घाटन

Team Agrowon

Parbhani News : दरवर्षी विविध कारणांमुळे जमिनीची धूप होत असल्याने मातीचा ऱ्हास होत आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. त्यादृष्टीने कृती आराखडा तयार करावा लागेल. हवामान बदलाच्या स्थितीत माती व पाणी यांच्या स्वरूपात होणारे बदल लक्षात घेऊन संशोधनाला प्राधान्य द्यावे लागेल.

कृषीच्या विद्यार्थ्यांतून चांगले मृदाशास्त्रज्ञ घडले पाहिजेत. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक डॉ. एस. के. चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये भारतीय मृद्‍ विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेतर्फे गुरुवारी (ता. २१) व शुक्रवारी (ता. २२) ‘अन्न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करणे’ या विषयावर मृद्‍ शास्त्रज्ञांचा राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २१) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या वेळी डॉ. चौधरी बोलत होते. कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्‍यक्षस्‍थानी होते.

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बी. एस. द्विवेदी, हैदराबाद येथील इक्रिसॅटचे जागतिक संशोधन कार्यक्रम संचालक डॉ. एम. एल. जाट, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद ईस्माइल, मृदाविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष तथा मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. अनिल धमक आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हवामान बदलाच्या स्थितीत शेतकऱ्यांना जोखीम व्यवस्थापन शिकवावे लागेल. मातीचा वापर करण्याचा अधिकार आहे. माती नष्ट करण्याचा अधिकार नाही. प्रास्ताविक डॉ. वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. तर डॉ. अनिल धमक यांनी आभार मानले.

डॉ. एन. एम. कोंडे यांना मृद्‍गंध पुरस्कार
मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विषयातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ एन. एम. कोंडे यांना भारतीय मृदा विज्ञान संस्थेतर्फे मृद्‍गंध पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT