Natural Industries Group Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Industries Group : नॅचरल शुगर सात लाख टन ऊस गाळप करणार

Sugarcane Crushing : नॅचरल उद्योग समूह या वर्षी गळीत हंगामात सात लाख टन उसाचे गाळप करणार असल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

Team Agrowon

Dharashiv News : नॅचरल उद्योग समूह या वर्षी गळीत हंगामात सात लाख टन उसाचे गाळप करणार असल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरलच्या २३ व्या गाळप हंगामाचा मागील गळीत हंगामात कारखान्यास गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे ऊस उत्पादक राकेश रामकृष्ण माकोडे व सौ. नूतन माकोडे या दांपत्याच्या हस्ते विधीवत पूजन करून बुधवारी (ता. १३) गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय भाषणात श्री. ठोंबरे बोलत होते.

श्री. ठोंबरे म्हणाले, की नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामात लागवड केलेल्या व खोडवा, ऊस सभासद व बिगर सभासद यांची सात हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झालेली आहे. किमान सात ते साडेसात लाख टन ऊस गाळपासाठी यावर्षी काही प्रमाणात गेटकेन मधूनही ऊस गाळपास घ्यावा लागेल.

श्री. ठोंबरे म्हणाले, की नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामात लागवड केलेल्या व खोडवा, ऊस सभासद व बिगर सभासद यांची सात हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झालेली आहे. किमान सात ते साडेसात लाख टन ऊस गाळपासाठी यावर्षी काही प्रमाणात गेटकेन मधूनही ऊस गाळपास घ्यावा लागेल.

नॅचरल शुगरने मागील लागवड हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये ऊस लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन तो वाढवला आणि त्याचे फलित म्हणजे नॅचरलचे कार्यक्षेत्रामध्ये दुष्काळी परिस्थितीतही काही प्रमाणात ऊस लागवड आणि खोडवा उसाचे संगोपन केल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये उसाचे क्षेत्र चांगले दिसून येत आहे. कारखान्याकडे नोंदवलेला सभासद व बिगर सभासदांचा संपूर्ण ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे गाळपास स्वीकारला जाणार आहे.

येत्या हंगामासाठी सभासद, बिगर सभासद यांच्या उसाची एकूण नोंद सात हजार हेक्टर झाली असून कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढवून चालू हंगामात प्रतिदिन ७५०० टन गाळप करण्यासाठी अत्याधुनिक मशीनरीची उभारणी केली असल्याने बिगर सभासदांनाही न्याय देण्यात येईल, असे ही श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

नॅचरल शुगर यावर्षी प्रतिदिन एक कोटी ७५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार असून त्यासाठी लागणारे बी हेवी मॉलेसिसचे जास्तीत जास्त उत्पादन घेणार आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा कमी होऊन, जास्त दैनंदिन गाळप यंदाही होणार असल्याने सभासदांचा व बिगर सभासदांचा ऊस वेळेत म्हणा किंवा वेळे पूर्वीही गाळप होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले. तर एन साई मल्टी स्टेट बँकेचे उपाध्यक्ष किशोर डाळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT