Amit Shaha Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

एका देशी गाईच्या शेणापासून २० एकर नैसर्गिक शेती करता येऊ शकते. सध्या अमूल २० प्रकारचे सेंद्रिय पदार्थांची विक्री करतं, असाही दावा शहा यांनी केला.

Dhananjay Sanap

नैसर्गिक शेतीतून केवळ समृद्धी आणेल, असं नाही तर देशातील शेतकऱ्यांसाठी जागतिक स्तरावर १० लाख कोटींची बाजारपेठही खुली करेल, असा दावा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित यांनी केला आहे. ते मंगळवारी (ता.१९) गुजरातमधील साबर डेअरीच्या पशूखाद्य उद्योगाचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी शहा यांनी नैसर्गिक शेती आणि दुग्ध व्यवसायामुळं देशातील शेतकरी समृद्ध होईल, यावर भाष्य केले.

शहा म्हणाले, "देशात दूध सहकारातील संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेतीचा समावेश करावा. त्रिभुवनदास पटेल यांनी दूध सहकार सुरू केला त्यावेळी अमूल ६० हजार कोटींचा व्यवसाय करेल, असं कोणालाही पटलं नसतं. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेती निरुपयोगी प्रकार वाटू शकतो. परंतु मी तुम्हाला सांगतो, की यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची जागतिक बाजारपेठ खुली होईल. त्यासाठी ग्रामीण भागातील या चळवळीचं नेतृत्व महिलांनी करावं, असंही शहा म्हणाले.

पुढे शहा म्हणाले, "पुढील काळात नैसर्गिक शेतीमुळे कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांपासून जगाला मुक्त करण्याचं एक साधन मिळेल. त्यामुळे नैसर्गिक शेती केवळ शेतकऱ्यांना समृद्ध करेल असं नाही तर ग्राहकांना करेल." असा दावाही शहा यांनी केला.

गाय शेतकऱ्यांना मदत करू शकते असा दावा करताना शहा म्हणाले, एक गाय शेतकऱ्याला २० एक शेतजमिनीसाठी मदत करू शकते. एका देशी गाईच्या शेणापासून २० एकर नैसर्गिक शेती करता येऊ शकते. सध्या अमूल २० प्रकारचे सेंद्रिय पदार्थांची विक्री करतं, असाही दावा शहा यांनी केला.

दरम्यान, साबर डेअरीच्या २१० कोटी रुपयांच्या पशुखाद्य प्लांटचे उद्घाटन केले. नवीन प्लांटमुळे साबर डेअरीच्या पशुखाद्य निर्मितीत प्रतिदिन १२५० टनावरून २ हजार मेट्रिक टनावर पोहचेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT