Natural Agriculture Training Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming Training : महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

Agriculture Training Program : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख अधिनिस्त कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे पार पडले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र, गांधेली आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख अधिनिस्त कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे पार पडले.

या प्रशिक्षणात २५१ गटप्रमुख व त्या संबंधित कृषी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षार्थिंना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कन्नड, खुलताबाद, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील गावांमधील नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या गटप्रमुखांचे व त्या संबंधित कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेविषयी सविस्तर माहिती, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमधील फरक, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीविषयी समज गैरसमज, सेंद्रिय शेतीचे महत्व, रासायनिक शेतीचे जमिनीवर व मानवावर होणारे परिणाम, माती व पाणी परीक्षण,

रसायनिक खताला सेंद्रिय खतांचे पर्याय, सेंद्रिय खते तयार करण्याच्या विविध पद्धती, जीवाणू खते, १० ड्रम थेअरी, जीवामृत, बिजामृत, ब्रम्हास्त्र, अग्निअस्त्र, निमअर्क, दशपर्णी अर्क, जैविक कीटकनाशके, कीटकनाशकाशिवाय किडनियंत्रण (मशागत, यांत्रिक, जैविक व भौतिक), प्रमाणीकरण या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच प्रातिनिधिक माती नमुना घेणे, जीवामृत, बिजामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या करीता आत्मा संचालक बी. एस. तौर, उपसंचालक अनिल कुलकर्णी, स्मार्टचे ए. ई. साळुंके, एमजीएम डॉ. के. ए. धापके, निवृत्त उपसंचालक, रामेति डॉ. पुरुषोत्तम जोशी, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख के. ए. सुकासे, विषय विशेषज्ञ (मृद्विज्ञान) एस. एस. वाघ व डॉ. प. दे. जैविक शेती मिशनच्या श्रीमती आर. आर. उंबरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT