Banana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Damage : केळी पीक नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात

Natural Calamity : गेल्या काही वर्षांत विविध महिन्यांत वादळ, गारपीट, करपा, सीएमव्ही आदी समस्यांत केळीची कोट्यवधींची हानी झाली आहे. प

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात मागील अनेक वर्षे केळीला वादळ, गारपीट, अतिथंडी, करपा, कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही), अति उष्णता आदी समस्यांचा फटका बसत आहे. दरवर्षी कोट्यवधींची हानी होत आहे. पण या समस्यांवर शाश्‍वत उपाय, सुरक्षात्मक उपायांसाठी प्रशासनाकडून फारशी मदत, कार्यवाही झालेली नसल्याची स्थिती आहे.

गेल्या काही वर्षांत विविध महिन्यांत वादळ, गारपीट, करपा, सीएमव्ही आदी समस्यांत केळीची कोट्यवधींची हानी झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतनिधीची घोषणा, शाश्‍वत कार्यक्रम शासन, प्रशासनाने आणलेला नाही. शेतकरी आपल्या ताकदीने या समस्यांशी लढत आहेत.

वादळात अनेकदा हानी झाली. अजूनही वादळात नुकसानीसंबंधीच्या २०१९ मधील नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा आहे. तर काही भागात २०२०, २१, २२, २३ मध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी आहे.

मागील वर्षीही मार्च ते जून या कालावधीत पावसाबरोबरच वादळात जळगाव, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील सुमारे तीन हजार हेक्टरवरील केळी पिकाची हानी झाली. त्यापूर्वीही अशीच हानी झाली.

फेब्रुवारी ते जून या कालावधीत केळीस वादळ, गारपीट, अतिउष्णतेमुळे नुकसान सहन करावे लागते. तर पावसाळ्यात सीएमव्ही, करपा, हिवाळ्यात अतिथंडी, चिलिंग, करपा रोगांची, आपत्तीची मालिका केळीवर सुरू असते.

जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी भागांत केळी लागवड वाढली आहे. केळीखालील क्षेत्र जळगाव जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. केळीसाठी करपा निर्मूलन कार्यक्रम बंद झाला. मागील मार्च ते जून या यादरम्यान या भागाला वादळी पावसाचा मोठा फटका बसला.

ठोस कार्यक्रम आखून कार्यवाही हवी

वादळ, गारपीट, अतिपाऊस हे थांबविणे शक्य नाही. पण करपा, सीएमव्ही, चिलिंगच्या समस्या, अतिथंडी व अति उष्णतेपासून केळी पिकास कसे वाचवायचे यासाठी ठोस कार्यक्रम, धोरण आखून शिवारापर्यंत कार्यवाही व्हायला हवी. संशोधन संस्था, कृषी यंत्रणा सक्रिय व्हायला हव्यात, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT