Natu Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Natu Award : कांचन परुळेकर, परमेश्‍वर काळे यांना नातू पुरस्कार जाहीर

Kanchan Parulekar : पुरस्काराचे पुण्यात मंगळवारी होणार वितरण

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर : ग्रामीण विकासाच्या व सामाजिक सेवेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुणे येथील नातू प्रतिष्‍ठानचा यंदाचा महादेव बळवंत नातू सेवागौरव पुरस्कार येथील स्वयंसिद्धा संस्थेच्‍या कांचन परुळेकर यांना जाहीर झाला आहे. सोलापूरच्या परमेश्‍वर काळे यांची सेवाव्रती कार्यकर्ता या पुरस्कारासाठी निवड झाली.

पुरस्काराचे वितरण मंगळवारी (ता. ९) महादेव बळवंत तथा भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्ञान प्रबोधनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार सोहळा पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील भारतीय विद्या भवनमधील नातू सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होईल. नातू ट्रस्टचे विश्‍वस्त चंद्रशेखर यार्दी, विवेक गिरिधारी अभया टोळ यांनी पुरस्काराची घोषणा केली.

हा पुरस्कार प्रामुख्याने दोन तपांहून अधिक काळात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. श्री. परुळेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य गेली अनेक वर्षे केले आहे.

परुळेकर यांना देण्यात येणाऱ्या सेवागौरव पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल व स्मृतिचिन्ह असे आहे. श्री काळे यांनी पारधी समाजातील मुला-मुलींना वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण देत संगोपन केले आहे. श्री. काळे यांना ५० हजार रुपये शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Deficit : सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनंतर सरासरीपेक्षा कमी पाऊस

Niphad Drought : निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना, सवलती लागू करा

Zilla Parishad : ‘जि. प.’ने दुष्काळासाठी विशेष सभा घ्यावी

Farmers Demand: उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा

Maharashtra Rainfall : ५६ महसूल मंडलांत निम्म्याहून कमी पाऊस

SCROLL FOR NEXT