Sharad Pawar Vs Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Election Commission Hearing : राष्ट्रवादी कुणाची ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर घमासान

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. यावेळी शरद पवार आणि अजित पवार गटाच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला.

Swapnil Shinde

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात उभी फूट पडली. ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकार सामील झाले. तसेच पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितल्याने हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला. आज सुनावणीवेळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्वत: शरद पवार हजर आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्यावतीने खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या समोरील तिसऱ्या सुनावणीवेळी शरद पवार गटाच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. शपथपत्रावरती युक्तिवाद करण्यात आले. त्यांच्यावतीने जवळपास सुमारे साडेसहा लाख शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये खासदार, आमदार, डेलिगेट्स आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश आहे.

सिंघवी यांनी युक्तिवाद करताना अजित पवार गटाच्या भूमिकावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला. त्यांच्यावतीने सादर करण्यात आलेले शपथपत्र खोटी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे प्रकरण गंभीर असून आयोगाच्यावतीने सलग सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड करत असताना अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांच्या सह्या आहेत. आयोगाने शरद पवार गटाचा युक्तिवाद एेकल्यानंतर २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT