Seed Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Subsidy : सेस फंडअंतर्गत ५० टक्के अनुदानावर बियाणे

Kharif Season 2025 : जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर तुरीचे ११.१० क्विंटल, मूग १०.२४ क्विंटल, उडीद १०.५४ क्विंटल व भुईमुगाचे १५७.८० क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर तुरीचे ११.१० क्विंटल, मूग १०.२४ क्विंटल, उडीद १०.५४ क्विंटल व भुईमुगाचे १५७.८० क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद नाशिकचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी केले.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थी निवड करून तूर, मूग, उडीद व भुईमूग या पिकांची लागवड करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावार हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक बियाण्यांचा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करावा.

अर्जासमवेत शेतकऱ्यांनी स्वत:चे/कुटुंबाचे नाव असलेले ७/१२ व ८-अचे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १ हेक्टरसाठी आवश्यक बियाण्यांचा लाभ देण्यात येईल. (बियाण्यांचा लाभ देताना एकापेक्षा अधिक बियाण्यांच्या क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे)

चालू आर्थिक वर्षात लाभ दिलेल्या शेतकऱ्याला दुबार लाभ दिला जाणार नाही. योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सातपूर, नाशिक व राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित नाशिक या शासन अंगिकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे बियाणे खरेदी करून पुरविण्यात येणार आहे.

या योजनेत ५० टक्के अनुदानावर तूर, मूग, उडीद व भुईमूग बियाणे देण्यात येणार असून अनुदान वजा जाता उर्वरित ५० टक्के वसूल करावयाची रक्कम गट स्तरावर बियाणेवाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल करून पुरवठादार संस्थेच्या नावे डी.डी./धनादेश काढून कृषी विकास कार्यालयास पाठविण्यात यावा.

तूर, मूग व उडीद बियाण्यांसाठी पुरवठादार संस्था महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, नाशिक ही असून भुईमूग बियाण्यांसाठी पुरवठादार संस्था राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित नाशिक ही आहे.

बियाणे बॅग वजन (किलो) दर (रुपये) अनुदान (रुपये)

तूर २ ३६० १८०

मूग २ ३९० १९५

उडीद २ ३८० १९०

भुईमूग २० २,२८० १,१४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rahul Mahiwal: ‘कृषी उद्योजक’ घडविणारी व्यवस्था आणू

PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती

Strawberry Pest Control: स्ट्रॉबेरीवरील लाल कोळी

Germany Agriculture Technology: गुट स्टाइनहॉफ जर्मनीतील शेतीची अनोखी गाथा

Interview with Sunil Patil: दरवाढीच्या संकटातही शेतकरी हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT