Nashik DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची ५१४ सोसायटी संचालकांना नोटीस

Co-Operative Bank Loan Recovery : धडक वसुली मोहीम हाती घेतलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील अवसायनात निघालेल्या ५१४ विविध कार्यकारी सोसायट्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.

Team Agrowon

Nashik News : धडक वसुली मोहीम हाती घेतलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील अवसायनात निघालेल्या ५१४ विविध कार्यकारी सोसायट्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. या सोसायट्यांमधील संचालकांवर कर्जाची जबाबदारी निश्चित करण्यात येत असल्याने संचालकांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा बँकच्या अखत्यारीत १,०४९ विविध कार्यकारी संस्था कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून पीककर्जाचे वाटप होते. या सोसायट्यांकडे १,३१६ कोटीचे पीककर्ज थकीत आहे. बँकचे एकूण २,३०० कोटीवर कर्ज थकल्याने बँकेने आता कठोर फावले उचलण्यास सुरवात केली आहे.

या कारवाईचा भाग म्हणून बँकेने जिल्ह्यात अवसायनात निघालेल्या ५१४ विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे १,०१५ कोटी २६ लाखांचे कर्ज आहे. त्याची जबाबदारी संचालक मंडळावर निश्चित करण्यात आले असल्याने सोसायटीच्या संचालकांच धाबे दणाणले आहे.

विहित मुदतीत बँकेने सलग दुसरी नोटीस बजावत सोसायट्यांना कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे कर्ज थकीत सोसायट्यांपैकी एकाही सोसायटीने बँकेला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, बँकेला प्रतिसाद न मिळाल्याने आता लवादपूर्व नोटीस जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार तत्कालीन संचालकांवर कर्जाची जवाबदारी निश्चित होऊ शकते.

संचालकांनी झटकले हात

विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी कर्ज वितरित केलेल्या कालावधीत कार्यरत असलेल्या संचालकांवर ही कारवाई होणे अपेक्षित आहे. कर्जवाटपानंतर कार्यरत झालेल्या संचालकांनी या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास हात झटकले आहेत. त्यामुळे बँकेने दोन वेळा पाठविलेल्या नोटिसांना संचालकांकडून उत्तर मिळत नसल्याचे दिसून येते.

बँक थेट शेतकऱ्यांना किंवा सभासदांना कर्जवाटप करत नाही. विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत कर्जाचे वितरण होते. त्यामुळे कर्ज वसुलीची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यानमार आम्ही कार्यवाही करत आहोत.
-प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक-जिल्हा बँक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT