Tanker Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : नांदगावला टॅंकरच्या पाण्यावरच भिस्त

Water Tanker : तालुक्यात एकीकडे दुष्काळाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्याचे नाव घेत नाही.

Team Agrowon

Nandgaon News : नांदगाव ः तालुक्यात एकीकडे दुष्काळाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील नळ योजनांची  स्थिती नाजूक असल्याने सगळी भिस्त आता टॅंकरवरच राहणार आहे, हे निश्चित.

मात्र, या टँकरमधून करण्यात आलेला पाणीपुरवठा अशुद्ध असून, पाण्याला खूपच दुर्गंधी असते. असे असूनही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेने टँकरचे पाणी शुद्ध ठरविले आहे.

ग्रामीण भागातील महिला पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या विहिरी शोधण्यासाठी पायपीट करत आहेत, त्यांचा तो नित्यक्रम बनला असून टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरले नाही तरी अन्य कारणांसाठी देखील वापर केला जात नाही.

नाग्यासाक्या धरणात सध्या मृतसाठा शिल्लक असला तरी त्याचीही पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या हा साठाही जूनपर्यत पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. भूजल प्रयोगशाळेत वास येणारे पाणी शुद्ध ठरत असल्याने त्यांच्या या संशोधनाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुक्याच्या आरोग्य विभागाकडे अशुद्ध पाणी पुरवठ्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य साथीचा प्रश्न उभा राहण्याची भीती तर भूजल पाण्याचे नमुने योग्य ठरवीत आहे. टँकरमधील पाणी शुद्ध व निर्जंतूक आहे का, याची तपासणी कशी केली जाते?  याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आम्ही टीसीएल टाकतो असा बचावावात्मक पवित्रा घेतला जात आहे.

याअनुषंगाने केला जात असला तरी शास्त्रोक्त पद्धतेीने पाण्यात पाणी निर्जंतूक करण्यासाठी क्लोरिन टाकले पाहिजे, टँकरमधील पाणी परीक्षानळीत घेऊन या पाण्यात ओटी (ऑर्थो टोलुडीन) नावाचे एक सोल्यूशन टाकले जाते. पाण्यात क्लोरिन टाकले असेल, तर या पाण्याचा रंग बदलतो.

...तर ‘गिरणा’चे पाणी उचलणार
सध्या एकूण टँकरची वाढती मागणी लक्षात घेता नाग्यासाक्या धरणाजवळ बुडक्या घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली.

गरज पडल्यास ‘गिरणा’चे पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. एकूणच सध्या दुष्काळाच्या  संकटात यंत्रणेने अलर्ट होण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT