Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये केवळ एकच दिवस पाऊस

Maharashtra Rain : जून, जुलैमध्ये सर्वाधिक, तर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सर्वसाधारण पाऊस पडतो. परंतु यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात यंदा जून महिन्यात केवळ सहा दिवस पावसाचे गणले गेले आहेत. यानंतर जुलैमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावत तब्बल २४ दिवस पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात नऊ, सप्टेंबर १८, तर ऑक्टोबरमध्ये एकच दिवस पावसाचा नोंदला आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील १५३ दिवसांत केवळ ५७ दिवसच पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. हा पाऊस जून, जुलैमध्ये सर्वाधिक, तर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सर्वसाधारण पाऊस पडतो. परंतु यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महिन्यात केवळ सहा दिवसच पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरण्या लांबल्या होत्या. यानंतर मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे जुलैमध्ये तब्बल २४ दिवस पावसाचे नोंदले गेले.

यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने पुन्हा जून प्रमाणे दडी मारायला सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात पावसाचे केवळ नऊ दिवस गणले गेले आहेत. यानंतर सप्टेंबरमध्ये १८ दिवस पावसाचे गणने गेले. यानंतर ऑक्टोबरमध्ये मात्र पावसाने पाठ फिरविली. ऑक्टोबरमध्ये केवळ एकच दिवस पावसाचा गणला गेला. या महिन्यात परतीचा पाऊस हजेरी लावतो.

परंतु यंदा हा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामावर पाणी फेरले आहे. पावसाळाच्या जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील १५३ दिवसांपैकी यंदा केवळ ५७ दिवसच पावसाचे गणले गेले आहेत. मागील वर्षी पाच महिन्यांत ७६ दिवस पाऊस झाला होता.

दोन वर्षांतील पावसाचे दिवस

महिना २०२३ २०२२

जून ६ २२

जुले २४ २६

ऑगस्ट ९ १०

सप्टेंबर १८ १६

ऑक्टोबर १ ९

एकूण ५७ ७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT