Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : नायब तहसीलदारांची थेट शेतीच्या बांधावर सुनावणी

Latest Agriculture News : तिवसा महसूल विभागातील पाचही मंडळाच्या कामकाजाची धुरा हाती घेताच नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी ३३ प्रकरणातील सात रस्ता अडवणूक प्रकरणांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुनावणी केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : तिवसा महसूल विभागातील पाचही मंडळाच्या कामकाजाची धुरा हाती घेताच नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी ३३ प्रकरणातील सात रस्ता अडवणूक प्रकरणांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुनावणी केली. आठ दिवसांत ही प्रकरणे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन -तीन वर्षांपासूनची रस्त्याची प्रकरणे तहसील कार्यालयात सुनावणीवर असल्यामुळे तालुक्यातील किती तरी शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीवर उत्पन्न घेता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये मोठे वाद निर्माण होताना दिसून येतात.

घोटा येथील शेतकरी निरंजन दवाळे यांच्या दोन एकर शेतात जाण्याकरिता येथील गैरअर्जदार हे अडवणूक करत होते. त्यामुळे त्यांनी दोन वर्षांआधी कायमस्वरूपी शेतीतून वहिवाट रस्ता मिळावा अशा मागणीचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला होता. प्रकरणात दोन वर्षांपासून दिलासादायक निकाल मिळाला नाही.

परिणामी यामध्ये अनेकदा वादही झाले. मात्र नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी जबाबदारी घेताच रस्ता अडवणुकीच्या प्रकरणाची तातडीने सुनावणी व शेतकऱ्यांची मध्यस्थी करून आठ दिवसांत सात प्रकरणाचा शेतीच्या बांधावर ताबडतोब निकाल दिला.

त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून शेतकऱ्यांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. घोटा येथील शेतीच्या बांधावर सुनावणी करताना मंडळ अधिकारी प्रशांत जायदे, तलाठी चरणसिंग दुलत, महसूल सहायक राहुल निस्वादे व शेतकरी अर्जदार, गैर अर्जदार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT