Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : कृषी पुरस्कार सोहळ्यावर नागपूरची छाप

Agriculture Department : कृषी विभागाच्या मागदर्शनात पीक व्यवस्थापनात बदलासोबतच व्यावसायिक पिकांची कास धरत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गौरविण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : कृषी विभागाच्या मागदर्शनात पीक व्यवस्थापनात बदलासोबतच व्यावसायिक पिकांची कास धरत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गौरविण्यात आले आहे. मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कृषी विभागाच्या वतीने राज्यातील २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांतील प्रयोगशील शेतकऱ्यांना मुंबईतील एका दिमाखदार सोहळ्यात गौरविले. कृषिरत्न, कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यासह शेतीमित्र, शेतीनिष्ठ, उद्यान पंडित व युवा शेतकरी वर्गवारीत शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची या वेळी उपस्थिती होती. यात नागपूर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

त्यामध्ये शशिकला केशव खापरे यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. एच. एम. बालचंद्र मूर्ती (कृषिभूषण सेंद्रिय शेती), निकेश ईश्‍वर बागडे (युवा शेतकरी), वासुदेव भास्कर वाडकर (उद्यान पंडित), नरेंद्र वसंतराव महल्ले (शेतीनिष्ठ शेतकरी), रूपेश जनार्दन सयाम (शेतीनिष्ठ शेतकरी आदिवासी गट), भीमराव कडू (कृषिभूषण), लक्ष्मण गोमाजी डडमल (कृषिभूषण सेंद्रिय शेती), देविदास मदनकर (उद्यान पंडित), सुनील चरपे (शेतीमित्र), चंद्रभान सावरकर (शेतीनिष्ठ) याप्रमाणे शेतकऱ्यांचा समावेश आहे.

विजेत्या शेतकऱ्यांचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी अभिनंदन केले आहे. २०२१ या वर्षातील राज्यस्तरीय पीक स्पर्धेत तुरीच्या उत्पादनात संजय विठ्ठल सत्यकार, माणिक विष्णू धुर्वे, शांताराम वामन नागोसे, सुरेश जंगलु कुंभरे यांनी विजेतेपद पटकाविले होते. या सर्वांचाही राज्यपालांनी सन्मान केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT