Chana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावनोंदणी करावी

Chana Market : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या वतीने २७ मार्चपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Buldana News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या वतीने २७ मार्चपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २५ एप्रिलपर्यंत संबंधित खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीदराने हरभरा खरेदीसाठी नोंदणीसाठी जिल्हयात केंद्र सुरू झाले आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती बुलडाणा, मेहकर, लोणार, शेगाव, संग्रामपूर, मोताळा येथे संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, चिखली येथे स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, पिंप्री खंदारे-दुसरबीड येथे बिबी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, वरवट बकाल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, माटरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव, देऊळगावराजा येथे ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी,

सिंदखेडराजा येथे तापडीया ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी, अंजनीखुर्द येथे श्रीनंदना महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनी, साखरखेर्डा येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, बिबी येथे शेतीसेवा अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, जानेफळ येथे विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनी, वडगाव पाटण येथे कुल भवानी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, हिरडव येथे राजश्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मेराखुर्द येथे श्राव्यलक्ष्मी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अमडापूर येथे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, भोरटेक येथे जय सरदार कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी,

जांभुळधाबा येथे मॉं जगदंबा फार्मर प्रोड्यूसर कंपनी, पळशी झाशी येथे बळीराजा कृषिमाल प्रक्रिया बहुउद्देशीय सहकारी संस्था, मारोती पेठ येथे देवी तुळजाई अॅग्रोटेक प्रोड्यूसर कंपनी, सोनाळा येथे किसान कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था, सिनगाव जहाँगीर येथे संत देविदास महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनी, वाघाळा येथे झोटिंगा ॲग्रो कंपनी, गोरेगाव येथे मॉँ. तुळजाई अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, धामणगाव बढे येथे संत गजानन महिला फार्मर कंपनी, मोळा येथे अॅक्टीफील्ड फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि धाड या ठिकाणी शिवशंभो अॅग्रोटेक प्रोड्युसर कंपनी, अशा ३२ खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा ऑनलाइन पीकपेरासह, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT