Shri Guru Paduka Darshan Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Shri Guru Paduka Darshan: मुंबईत भक्तीचा महासागर! आजपासून श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाची सुरुवात

Saints’ Paduka Festival : मुंबईतील वरळी एनएससीआय डोममध्ये आजपासून दोन दिवसांसाठी श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून, पहिल्यांदाच २१ संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

Team Agrowon

Mumbai News: ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज झाला आहे. शनिवारी (ता. ८) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्‌घाटन होणार आहे. एकाच ठिकाणी २१ संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मुंबईकरांना पहिल्यांदाच मिळणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली आहे.

दोनदिवसीय सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. ७) भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांचा आढावा घेऊन, आयोजनात कुठलीही उणीव राहू नये यासाठी या सोहळास्थळी ठिकठिकाणी उपस्थित राहणारे स्वयंसेवक आपापल्या जबाबदारीची रंगीत तालीम करत होते. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला ‘भक्तिपीठा’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शनिवारी सकाळी गुरुसेवक, भाविक, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन सोहळ्यानंतर पादुका दर्शन सुरू होणार आहे, त्यासाठी कुणाचीही गैरसोय न होता शिस्तबद्ध दर्शन व्हावे, यासाठी स्वयंसेवकांची टीम सज्ज झाली आहे.

नोंदणी करून आलेल्या भाविकांना ‘क्यूआर’ कोड स्कॅन करणारे कक्ष, भाविकांची पादत्राणे ठेवण्यासाठी मंडपाबाहेर विशेष कक्ष, साधकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग किंवा ज्यांना चालता येत नाही अशांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था असणार आहे. भाविकांसाठी आरोग्य सेवा कक्षासह विविध स्टॉल आहेत. दर्शनार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मंडपामध्ये ठिकठिकाणी स्वयंसेवक सज्ज राहणार आहेत.

उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्‍चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनगरीय रेल्वे स्थानके असून, कार्यक्रमस्थळाशेजारी नेहरू तारांगण हे ‘बेस्ट’चे बस स्थानक आहे. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्रीपादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचे क्यूआर कोड स्कॅन करून, आपला प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका

ज्ञानेश्‍वर महाराज

संत मुक्त्ताई

नामदेव महाराज

संत जनाबाई

नरहरी सोनार

सेना महाराज

सावता माळी

एकनाथ महाराज

तुकाराम महाराज

संत निळोबाराय

श्री महेश्‍वरनाथ बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर

महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सद्‌गुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT