Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : बहूजमीनधारक शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीपासून वंचित

Crop Damage : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली. यामध्ये बहू जमीनधारणा क्षेत्रधारक शेतकऱ्यांना फक्त एकाच शेतातील नुकसानीसाठी मदत मिळाली आहे.

इतर गट नंबरमधील मदत मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी गोपाल पोहरे, राम पोहरे यांनी शासनाकडे केली आहे.

निवेदनानुसार, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी एकापेक्षा अधिक शिवार, महसूल मंडलांत आहेत. शासनाद्वारे देण्यात येणारी नैसर्गिक आपत्तीची मदत ही आधार प्रमाणीकरण करून दिली जाते.

एका शेतकऱ्याच्या जमिनी वेगवेगळ्या शिवारामध्ये असतील तर त्यातील फक्त एकाच जमिनीला मदत भेटत आहे. मात्र शासनाच्या तीन हेक्टर मर्यादेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात ही बाब अडचणीची ठरते आहे.

परिणामी शेतकऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. वेगवेगळ्या महसूल मंडलांतील शिवारात जमिनी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत लाभ देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा, अशी मागणी सोमवारी (ता. ८) करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT