Ladaki Bahin Yojana agrowon
ॲग्रो विशेष

Ladaki Bahin Yojana : दोन लाख ‘लाडक्या बहिणीं’ची बँक खातीच नाहीत, कोल्हापूर जिल्हा परिषदेची वाढणार डोकेदुखी

Kolhapur Jilha Parishad : कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास दोन लाखांहून अधिक महिलांची बँक खातीच नसल्याचे समोर आले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास दोन लाखांहून अधिक महिलांची बँक खातीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पात्र महिलांना लाभ देण्यासाठी आणि त्यांची नव्याने बँक खाती सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला मात्र पायाला भिंगरी लावून काम करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत गावागावांत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या या योजनेसाठी जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. राज्य शासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेत आहे.

जिल्ह्यातील नियमानुसार पात्र होणाऱ्या प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळाला पाहिजे, असा शासनाचा आग्रह आहे. सध्या ज्या महिलांची बँक खाती आहेत, ज्यांची योग्य ती कागदपत्रे आहेत. शासनाच्या नियम आणि निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे अशा महिलांची हा लाभ मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटूंबातील महिलांची बँक खातीच सुरू केलेली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात केडीसीसी, राष्ट्रीयकृत, नागरी बँकांच्या एकूण ३१९ शाखा आहे. पुरुषांची खाती सर्वाधिक आहे. बँक खाती नसलेल्या महिलांना लाभ देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाला ही खाते सुरू करण्यासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्यांची बँक खाती आहेत त्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. ज्या महिलांची बँक खाती सुरू केलेली नाहीत, अशा महिलांना पोस्ट बँकेचा पर्याय देण्याबाबत चर्चा झाली आहे. पोस्ट बँकेत एका दिवसात आणि घरात जाऊन बँक खाती सुरू केली जातात. त्यामुळे पोस्ट बँकेचा पर्याय चांगला आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT