MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif MSP : हमीभाव शिफारस बैठक भोपाळला होणार

Kharif Season : खरीप २०२४-२५ या वर्षासाठी विविध शेतीमालांचे हमीभाव निश्‍चित करण्याकरिता पश्‍चिम विभागातील राज्यांची बैठक २ फेब्रुवारी रोजी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : खरीप २०२४-२५ या वर्षासाठी विविध शेतीमालांचे हमीभाव निश्‍चित करण्याकरिता पश्‍चिम विभागातील राज्यांची बैठक २ फेब्रुवारी रोजी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली आहे. या झोनमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दमण-दिव या सहा राज्यांचा समावेश होतो.

हमीभाव निश्‍चितीच्या अनुषंगाने देशभरात चार झोनचा समावेश करण्यात आला असून त्यातील दोन झोनच्या बैठका यापूर्वीच झाल्या आहेत. केंद्रिय कृषी मंत्रालयाकडून हमीभाव निश्‍चितीकरिता त्या-त्या राज्यांतील शिफारसी विचारात घेतल्या जातात.

कृषी विद्यापीठस्तरावर असलेल्या अर्थशास्त्र विभागाकडून प्राप्त खर्च, उत्पादकता व त्यावर आधारित किती दर असला पाहिजे ही बाबही लक्षात घेतली जाते. त्यानंतर झोननिहाय बैठकीत यावर मंथन होत या बैठकीत शेतकऱ्यांच्या सूचनाही ऐकल्या जातात. या बैठकीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत विविध पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकऱ्यांचा विचार होतो.

सध्या राज्यात चार झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्व, पश्‍चिम, उत्तर आणि दक्षिण अशा झोनचा समावेश आहे. हैदराबाद आणि चंदीगड अशा दोन ठिकाणी उत्तर आणि पूर्व झोनची बैठक यापूर्वीच पार पडली.

महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेल्या पश्‍चिम झोनची बैठक येत्या २ फेब्रुवारी रोजी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणार आहे. या भागात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन, कापूस व इतर पिकाचे हमीभाव काय असावेत यावर या बैठकीत विचार विनिमय होईल.

या शिफारसी नंतर केंद्रिय कृषी मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून या बैठकीसाठी पुरस्कारप्राप्त शेतकरी म्हणून अमरावती येथील रवींद्र मेटकर हे एकमेव प्रतिनिधी सहभागी होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT