ॲग्रो विशेष

MPSC Agricultural Services : कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांच्या लढ्याला यश, सरकारकडून नियुक्ती पत्राचे आदेश

Maharashtra Government : राज्य सरकारकडून दखल घेत पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे शासन आदेश काढण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Agricultur Services Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे केली होती. या उमेदवारांना अनेक दिवसांपासून नियुक्ती न दिल्याने ते आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले होते.

या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली केली होती. यावर राज्य सरकारकडून दखल घेत पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे शासन आदेश काढण्यात आला आहे.

कृषी सेवा परीक्षेतील शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्याने या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणीमुळे नियुक्तीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

नियुक्त्या रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यात कृषी अधिकारी पदाच्या जागा रिक्त होत्या. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. शेतकरी संकटात आहे. या परिस्थितीत नियुक्त्या वेळीच करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया देत निवड झालेल्या उमेदवारांचे वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.

वडेट्टीवार यांनी काय केली होती मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली होती.

कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २)-६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांची कागदपत्रे दिनांक १७ व १८ ऑगस्ट, २०२३ रोजी तपासून पूर्ण झालेली असूनही मागील ७ महिन्यापासून यांच्या नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

SCROLL FOR NEXT