Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Sale : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आंबा विक्रीतून पावणे दोन कोटींचे उत्पन्न

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभाग व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील आंबा फळांच्या लिलावातून यंदा विक्रमी १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभाग व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील आंबा फळांच्या लिलावातून यंदा विक्रमी १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के उत्पन्न अधिक मिळाल्याचे सांगितले जात आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी सांगितले, की बियाणे विभाग, मध्यवर्ती रोपवाटिका, इतर विभागाच्या प्रक्षेत्रावर मिळून ६,१२६ झाडे व उद्यानविद्या विभागाअंतर्गत असलेल्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील ३०७१ अशी ९ हजार १९७ झाडे आहेत. त्यात प्रामुख्याने केसर, लंगडा, वनराज, तोतापुरी आदी वाणांची झाडे असून या आंबा फळ वाणांची ई-निविदा प्रणालीने विक्री करण्यात आली.

बियाणे विभागाअंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रावरील झाडांपासून १ कोटी १३ लाख व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेतील आंबा फळझाडांपासून ७१ लाख असे एकूण १ कोटी ८४ लाखांचे विद्यापीठाला उत्पन्न मिळाले आहे. विद्यापीठाकडील आंबा चविष्ट व गुणवत्तापूर्ण असल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथील व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद नोंदवला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली नियोजन केले जाते. खते, कीटकनाशक फवारणी व फळधारणेच्या काळात योग्य पाण्याची व्यवस्था केल्यामुळे झाडांना चांगल्या प्रकारची फळधारणा दिसून आली. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची आंबा बागा खरेदीसाठी चढाओढ निर्माण झाली. विद्यापीठाचे नियंत्रक सदाशिव पाटील यांनी ई-निविदा उघडताना योग्य त्या लेखासंहितेचा अवलंब करून अचूक मार्गदर्शन केले.

डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनाखाली मध्यवर्ती रोपवाटिका प्रभारी अधिकारी प्रा. मंजाबापू गावडे, ई विभागाचे प्रभारी अधिकारी प्रा. एस. व्ही. पाटील व अ/ब विभागाचे प्रभारी अधिकारी प्रवीण बन तसेच उद्यानविद्या विभागाअंतर्गत असलेल्या रोपवाटिकेचे प्रमुख डॉ. सचिन मगर यांनी आंबा फळ उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले. आंबा फळांची योग्य वेळेत विक्री होण्यासाठी प्रा. बी. टी. शेटे, डॉ. के. सी. गागरे, डॉ. रश्मी भोगे, डॉ. माने, श्री. अभिजीत सांगळे, संगीता माने व संदीप कोकाटे यांनी योग्य व अचूक नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT