MPKV Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Vacancies : कृषी विद्यापीठातील रिक्त पदाचा कामकाजाला फटका

Agriculture University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ५७ टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा फटका कामकाजाला बसत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ५७ टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा फटका कामकाजाला बसत आहे. संशोधन व प्रसारण कार्य ठप्प झाले आहे. एकेकाळी देशात अग्रगण्य असलेल्या या विद्यापीठाचे मानांकन निचांकी पातळीकडे घसरले आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश फोल ठरत आहे. राज्य सरकारने रिक्तपदे भरली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार राजेंद्रकुमार पाटील यांनी नुकताच स्वीकारला. त्यांची तनपुरे यांनी भेट घेऊन स्वागत केले. या वेळी संजय कुलकर्णी, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, उद्यान विभागाचे अधिकारी दत्तात्रेय कदम उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी पाटील यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे.

त्यांनी यापूर्वीही या पदावर उत्कृष्ट काम केले आहे. असेच विद्यापीठ, शेतकरी व कर्मचारीहिताचे काम यापुढेही करावे, अशा शुभेच्छा माजी खासदार तनपुरे यांनी दिल्या. त्यांनी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा, टिश्‍यू कल्चर प्रयोगशाळेत मागील वीस वर्षांत झालेले संशोधन कार्य व त्याचा शेतकऱ्यांना झालेला लाभ याची माहिती कुलसचिव पाटील यांना विचारली. त्यावर शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा विषय समोर आला.

५७ टक्के रिक्त पदांमुळे कामकाजाला फटका बसला. जूनमध्ये रिक्तपदे ६५ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा सदस्य असताना तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून जैवतंत्रज्ञान व टिश्‍यू कल्चर प्रयोगशाळेसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला.

तेथील कोट्यवधींची मशिनरी धुळखात पडून आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व प्रसारण कार्याचा वेग मंदावला आहे. एकाच शास्त्रज्ञांकडे दोन-तीन विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविणे भाग पडले. राज्य सरकारने गांभीर्याने कृषी विद्यापीठाच्या रिक्त पदांच्या नियुक्त्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

SCROLL FOR NEXT