Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule : कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

Department of Agriculture : खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषी विभागाच्या घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. सुळे यांनी  कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरून बुधवारी (ता.१७) जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'विवेक'च्या संदर्भावरून कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपने आपल्या जनसंवाद यात्रेतून जनतेला सहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे. 

यावेळी सुळे यांनी, भाजपने भ्रष्टाचार आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांचे काय झालं? यावर बोलावं. दूध, कांदा, हमीभाव आणि महागाईच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय? तसेच राज्याने काढलेल्या कर्ज, अर्थसंकल्पातील घोषणांवर खर्च करण्यासाठी पैसा आहे का यावर देखील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. तर “बेरोजगारीवर भाजप आणि सरकारची नेमकी भूमिका काय? यावर भाजपने बोलावं. त्यांना जमत नसेल तर मित्र पक्षांनीही याबाबत बोलावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे. 

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून सुळे यांनी टीका केली आहे. सुळे म्हणाल्या, संघाने फडणवीस यांच्याकडे कृषी विभागात घोटाळ्याची तक्रार केली ही गंभीर बाब आहे. याबाबत संघाच्या 'विवेक' या साप्ताहिकात लेख आला आहे.

तसेच भाजपने जरूर जनसंवाद यात्रा काढावी. पण कधीतरी भाजपने खरं बोलावं असा टोला सुळे यांनी लगावला. तसेच जर या जनसवांद यात्रेत भाजपने खरे बोलल्यास आपण त्यांचे स्वागत करू असेही सुळे म्हणाल्या. तर भाजपला माझ्या सहा प्रश्नांची उत्तरे देणे जमत नसेल तर भाजपच्या मित्र पक्षांनी ती द्यावीत अशी मागणी सुळे यांनी केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT