Sharad Pawar on Milk Price Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar on Milk Price : दूध उत्पादकांच्या प्रश्नामध्ये आता शरद पवार लक्ष घालणार

Protest over Milk Price in Akole : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे १४ दिवसापासून दुधाच्या दरावरून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरून आता खासदार शरद पवार लक्ष घालणार आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दुधाला ४० रूपये प्रति लिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती राज्यभर आंदोलन करत आहे. तर दुधाच्या प्रश्नावरून संघर्ष सप्ताहच्या माध्यमातून आता राज्यभर विविध आंदोलने केली जात आहेत. यादरम्यान गेल्या १४ दिवसापासून अकोले येथे सुरू असणाऱ्या शेतकरी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. अकोले येथील आंदोलन आणि दुधाच्या प्रश्नावर लक्ष घालू, असे खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता.२०) आश्वासन दिले आहे. ते अकोले येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर बोलत होते. यावेळी खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.

शरद पवार अकोले येथे अशोकराव भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. यावेळी दुधाच्या दरासाठी अकोले येथे आंदोलन करणारे शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने पवार यांना निवेदन दिले. तसेच या निवेदनातून पवार यांच्याकडे, दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. त्यावरून पवार यांनी, दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करून प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू असे, आश्वासन आंदोलकांना दिले.

यावेळी शेतकरी मेळ्याव्यात ढवळे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणी करताना दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत सखोल विश्लेषण केले. तसेच शेतकरी मेळ्यात अकोले येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. यावरून उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हात उंचावून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

तसेच किसान सभेने विविध प्रश्नांबाबत व विशेषतः दूध उत्पादकांच्या सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सक्रियपणे उतरावे असे आवाहन केले. तर अकोलेसह इतर ठिकाणी केल्या जाणाऱ्या आंदोलनांच्या पाठीमागे किसान सभा ठामपणे असल्याचे ढवळे म्हणाले.

तर राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच शीर्ष नेतृत्वासह सत्तेत असणाऱ्या सर्व सत्ताधार्‍यांना भेटणार असल्याची माहिती ढवळे यांनी दिली. तर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची भेट घेऊन दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आवाहन करणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले. तर सोमवारी (ता.२२) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दूध प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचेही ढवळे यांनी यावेळी जाहीर केले.

शरद पवार यांना निवेदन देताना, आंदोलनाचे नेतृत्व करणारे सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ यांच्यासह इतर शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT