Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : '...सध्या तरी निवृत्तीचा कोणताच विचार नाही', शरद पवार यांचे निवृत्तीचे वृत्त फेटाळले

Sharad Pawar Ncp : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीला जोर वाढला असून काहीच दिवसांपूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेचा विचार करावा लागेल, असे म्हणत निवृत्तीचे संकेत दिले होते.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काहीच दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पण आता शरद पवार यांनी, आपल्या राजकीय निवृत्तीचे वृत्त फेटाळले असून राज्याच्या हिताचा विचार करता आपण अजिबात निवृत्त होणार नाही, असे म्हटले आहे.

शरद पवार यांनी, राजकारणातून आपण निवृत्त घेणार नसून संसदीय कामकाजाऐवजी पक्ष संघटनेच्या कामात भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांनी, आपल्याला राजकारणात नवी नवी पिढी तयार करायची असून राज्याच्या हिताचे पुढील ५० वर्षांचे नियोजन करायचे असल्याचे म्हटले आहे.

यासाठी आपण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तरुण पिढीला पुढे आणत आहोत. अनेक तरूणांना उमेदवारी दिली आहे. ज्यात दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील, युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह अनेक तरूण चेहरे आहेत. पुढील काळातही तरुणांकडे जबाबदारी देण्याचे नियोजन करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

याआधी देखील आपण असाच निर्णय २०१४ साली घेतला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्यसभेवर आहे. याचेही दोन वर्षे बाकी आहेत. तो कार्यकाल संपला की पाहू पुढे काय करायचे ते. यामुळे संसदीय राजकारणापेक्षा आता संघटनात्मक आणि पक्षीय राजकारणाकडे लक्ष देण्यावर भर असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री कोणाचा?

राज्यातील जनता आमच्या मागे असून महाविकास आघाडीचेच सरकार येईल, यात शंका नाही. यामुळे ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, अशी आपली भूमिका असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT