Shivsena Thackeray Group agrowon
ॲग्रो विशेष

Shivsena Thackeray Group : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार; ठाकरेंच्या खासदारांकडून कोल्हापुरात सूचना

MP Anil Desai : राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून स्वबळाचे संकेत दिले जात आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी काळातील निवडणुका स्बबळावर लढणार असल्याचे वक्तव्य केले होते.

यानंतर खासदार अनिल देसाई हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांनीही ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडी आगामी काळात एकत्र लढणार का? याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

नृसिंहवाडी येथे सदिच्छा भेट व दत्त दर्शनप्रसंगी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता देसाई म्हणाले की, "राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे निष्ठावान शिवसैनिकाला संधी मिळू शकते." असे मत शिवसेना (ठाकरे गट) खासदार  अनिल देसाई यांनी येथे व्यक्त केले.

खासदार देसाई म्हणाले, "लोकसभेला महाविकास आघाडी एकदिलाने लढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे शिवसेनेला फारसे यश मिळू शकले नाही. यावेळी त्या-त्या मतदारसंघांतील स्थानिक शिवसैनिकाला संधी मिळू शकली नसल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला, तो अत्यंत योग्यच आहे". असेही देसाई म्हणाले.

"यामुळे या आगामी निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला काम करण्याची संधी चांगल्या प्रकारे मिळू शकणार आहे. जनतेच्या मनातील शिवसेना म्हणून काम करण्याची संधी मिळणार असल्याच्या भावना अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.’ अनंत धनवडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सुनील शिंत्रे, वैभव उगळे, संजय अनुसे, प्रतीक धनावडे, पिंटू नरके आदी पदाधिकारी उपस्थित होते." असे देसाई म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT