Panchganga River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Panchganga River Pollution : नदी उशाला प्रदुषण घशाला, युवकांचे पंचगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन

Panchganga River Movement : हातकणंगले तालुक्यातील रुकडी परिसरात असणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया कारखान्यांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे.

sandeep Shirguppe

Panchaganga River Pollution : मागच्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न असाच प्रलंबीत आहे. दरम्यान पंचगंगा स्वच्छतेसाठी कित्येकवेळा जनआंदोलने उभारण्यात आली परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. काल यावर पुन्हा आंदोलन करण्यात आले यावर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनीधीने लक्ष न घातल्याने जनभावनेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले. रुकडी परिसरात असणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया कारखान्यांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले प्रदूषित सांडपाणी मिसळून नदी दूषित झाली आहे. नागरिकांच्या आरोग्य व शेतीवर दुष्परिणाम होत आहे. पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया उद्योगांवर कारवाई करावी, यासाठी अॅड. अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी पंचगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन केले.

याप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी ने. एस. साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, रुकडी परिसरात गेली दहा दिवस पंचगंगा नदी अतिप्रदूषित आहे. मृत माशांचा खच पडल्यानेदुर्गंधी, केंदाळामुळे नदीस गटारीचे स्वरूप आले होते. प्रतिवर्षी फेब्रुवारीदरम्यान येथील नदीपात्रात केंदाळ येण्याचा व मासे मृत होण्याच्या घटना घडत आहेत.

याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत आहे. तसेच रुकडी बंधारा येथून रुकडी, चिंचवाड, गांधीनगर, वळिवडे या गावांस पाणी पुरवठा होतो. मृत मासेव केंदाळामुळे सध्या नदीपात्रातील पाणी काळपट, गढूळ झाले आहे. शहरातील सांडपाणी व विविध औद्योगिक प्रक्रिया उद्योगांचे सांडपाणी मिसळल्याने पंचगंगा प्रदूषित होत आहे.

पंचगंगा तीरावर वसलेल्या गावांतील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावेळी अँड. अमितकुमार भोसले, अमर आठवले, नितीन कांबळे, सुनील भारमल, ओंकार किणींग, मनोज कोळी, रमेश शिंदे, प्रवीण लंबू, सतीश मगदूम, शामराव कोळी, शकील पठाण, प्रसाद गवळी, शिवाजी रेंदाळे आदी उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रदूषण मंडळाकडून कारवाई सुरू आहे. 66 येत्या आठ दिवसांत रुकडी परिसरातील कारखान्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- जे. एस. साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT