VNMKV Parbhani  Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत सामंजस्‍य करार

PDKV IAIR MoU : परभणी कृषी विद्यापीठनिर्मित तूर, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी पिकांचे अनेक वाण अत्‍यंत उपयुक्‍त आहेत.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्‍था (आयएआरआय) यांच्‍यामध्ये परभणी येथे गुरुवारी (ता. २२) कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण कार्याकरिता सामंजस्य करार करण्‍यात आला.

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुल‍सचिव पी. के. काळे, प्राचार्य डॉ. राकेश आहिरे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, डॉ. डी. एस. पेरके आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. सिंग म्‍हणाले, की परभणी कृषी विद्यापीठनिर्मित तूर, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी पिकांचे अनेक वाण अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. या सामंजस्‍य करारामुळे दोन्‍ही संस्‍थांतील संशोधनास मदत होणार आहे.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, की भारतीय कृषी संशोधन संस्‍था ही देशातील एक अग्रगण्‍य संस्‍था असून, या करारामुळे परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी त्‍यांच्‍या संशोधनास मदत होणार आहे.

दोन्‍ही संस्‍थांच्‍या माध्‍यमातून अद्ययावत विषयावर विविध प्रकारचे अभ्यासक्रम एकत्रित राबविले जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध तंत्रज्ञान व बियाणे यांचे देवाणघेवाण सोपे होईल. नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT