Jalna Zilha Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna District Bank Election : जालना जिल्हा बॅंक बिनविरोधसाठी हालचाली

District Bank Election Update : शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, बँकेला निवडणुकीच्या खाईत न ढकलता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, बँकेला निवडणुकीच्या खाईत न ढकलता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यामुळे येत्या काळात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकांना वेग येणार असल्याची शक्यता असल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केंद्रबिंदू असते. मात्र, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही वर्षांपूर्वी आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. मात्र, मागील दशकापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत असून, बँकेला आर्थिक नफा होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्बंधही हटले असून, नाबार्डच्या तपासणीमध्ये जिल्हा बँकेला बी प्लस वर्गवारी मिळाली आहे. तर, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होत चालली असल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक पीककर्ज वाटप केले जात आहे.

जिल्हा बँकेची मागील निवडणूक ही सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी एकत्र बसून १७ पैकी १५ जागा बिनविरोध केल्या होत्या. तर, केवळ दोन जागांसाठी निवडणूक झाली आहे.

यंदा ही बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांकडून पुढाकार घेण्यात आला असून, सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकांना येत्या काही दिवसांमध्ये वेग येणार असल्याचे संकेत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला राजकारणाचा अड्डा बनू नये, यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बसून या संदर्भात चर्चा केली जाणार आहे.
राजेश टोपे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक न घेता निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवधी आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व राजकीय नेत्यांची बैठक होईल. जागा वाटपासंदर्भात चर्चा करून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
संतोष दानवे, आमदार, भाजप
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील वर्षीप्रमाणे यंदा ही बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कैलास गोरंट्याल, आमदार, काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT