Moong Yellow Mosaic Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Cultivation : उडीद, मूग, तूर पिकांचे क्षेत्र होतेय कमी

Urad Cultivation : खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र सतत कमी होत आहे. पूर्वी हे क्षेत्र ५५ ते ५८ हजार हेक्टरपर्यंत असायचे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र सतत कमी होत आहे. पूर्वी हे क्षेत्र ५५ ते ५८ हजार हेक्टरपर्यंत असायचे. परंतु आजघडीला उडीद, मुगाखालील एकूण क्षेत्र ४० हजार हेक्टर एवढेदेखील राहत नसल्याची स्थिती आहे. यंदा तूर लागवडही जुजबी राहील, असे दिसते.

कारण तुरीचे दरही कमी होते. उडीद, मुगाची पेरणी खानदेशात पावसानंतर केली जाईल. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात मुगाची सुमारे १५ हजार हेक्टरवर तर उडदाची १६,२०० हेक्टरवर पेरणी झाली होती. धुळे व नंदुरबारमध्ये मिळून उडदाची सुमारे आठ हजार हेक्टरवर तर मुगाची सुमारे सहा हजार हेक्टरवर पेरणी झाली.

२०२०-२१ मध्ये खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र ५५ हजार हेक्टरपर्यंत होते. एकट्या जळगाव जिल्ह्यात उडदाची सुमारे १९ हजार हेक्टवर पेरणी झाली होती. तर मुगाचीदेखील सुमारे १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

यापूर्वीही उडदाची पेरणी २० ते २१ हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु पाऊस लांबणे किंवा जूनमधील पावसाचा खंड, अतिपाऊस यामुळे उडीद, मूग पिकांना मागील चार वर्षे सतत फटका बसला आहे. २०२३-२४ मध्ये पाऊस अल्प होता. जूनमध्ये २२ दिवस पावसाचा खंड होता. यामुळे उडीद, मूग पेरणी होऊ शकली नाही.

शिवाय अतिपावसात उडीद, मूग ही पिके पूर्णतः खराब होतात. त्यांचा चाराही हाती लागत नाही. शिवाय त्याचे बियाणे महाग आहे. फवारणी व अन्य खर्चही असतो. १० किलो बियाणे ८०० ते १४०० रुपयांना मिळते. शिवाय पुढे कापणी व मळणीचा खर्चही मोठा असतो. त्याचे दरही हंगामात कमी असतात. शेतकऱ्यांकडील साठा संपल्यानंतर दरात सुधारणा होते, असा अनुभव शेतकऱ्यांना आहे. यामुळे उडीद व मूग पेरणी खानदेशात कमी झाली आहे. २०२२-२३ मध्ये दुष्काळाचा फटका उडीद, मुगाला बसला. तर

त्यापूर्वीचे तीन वर्षे व मागील वर्षी (२०२४-२५) अतिवृष्टीने उडीद, मूग ही पिके हातची गेली. उडदाचे एकरी दीड क्विंटल उत्पादनदेखील मागील चार वर्षांत अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाही. उत्पादन हाती येतानाच ऑगस्टमध्ये पाऊस धुमाकूळ घालतो. यात कापणी व मळणी होत नाही. त्याचा दर्जा घसरतो व खरेदीदार दर पाडतात, असाही प्रकार घडला आहे.

काळ्या कसदार जमिनीत मक्यास प्राधान्य

खानदेशात काळ्या कसदार जमिनीत उडीद, मूग पिकाऐवजी सोयाबीन व मका पिकाची लागवड वाढत आहे. यंदा अनेकांनी मका व सोयाबीन लागवडीचे नियोजन केले आहे. मका पिकात तूर, सोयाबीनमध्ये तूर असे प्रयोगही उडीद व मूग पेरणीऐवजी शेतकऱ्यांनी मागील वेळेस केले आहेत. हलक्या व मध्यम जमिनीत तूर येत असल्याने तूर लागवड संबंधित भागात होईल. पण तूर लागवड घटेल. काळ्या कसदार जमिनीत मक्यास प्राधान्य मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT