Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : माॅन्सून २ दिवसांमध्ये पुन्हा प्रगती करणार; राज्यात पुढील ३ दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यातही पावसाची हजेरी वेगवेगळ्या भागात सुरुच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज दिला.

Team Agrowon

Pune News : माॅन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याच भागात मागील दोन दिवसांपासून आहे. तर माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून आणखी वाटचाल करण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. केरळसह देशातील काही भागात पाऊस पडत आहे. राज्यातही पावसाची हजेरी वेगवेगळ्या भागात सुरुच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज दिला.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मॉन्सूनने रविवारी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात चाल केली होती. तसेच दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनने प्रगती केली होती. पण आजही माॅन्सूनची सिमा याच भागात आहे. मात्र माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून नैऋत्य अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोरोरीनचा भाग आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अंदमान निकोबार तसेच अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर केरळच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळ आणि शेजारच्या भागात पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही मागील १० ते १२ दिवसांपासून काही भागात पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे, तर रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी हवामान उष्ण राहण्याचा अंदाज आहे.

बुधवार आणि गुरुवारीही विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभगााने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही, चंद्रकांत नवघरे यांची माहिती

Nandgaon APMC: नांदगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

Forest Rights: ताब्यातील जमीन वनपट्टेधारकांना मिळावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे

Pune APMC: परवाने दुसऱ्यांना, मनमानी जागावाटप! पुणे बाजार समितीच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची विधान परिषदेत मागणी

SCROLL FOR NEXT