PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi: मोदींचे विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हवाई हद्दीत!

Modi Aircraft: फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान ‘इंडिया वन’ने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याचे उघड झाले. अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारतीय विमानाला पाकिस्तानच्या परवानगीने त्यांच्या हद्दीतून जावे लागले.

Team Agrowon

New Delhi News: फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान ‘इंडिया वन’ने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याचे उघड झाले. अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारतीय विमानाला पाकिस्तानच्या परवानगीने त्यांच्या हद्दीतून जावे लागले.

‘एआरवाय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान शेखपुरा, हफिजाबाद, चकवाल, कोहाट यांसारख्या पाकिस्तानच्या भागातून फ्रान्सच्या दिशेने गेले. एकूण ४६ मिनिटांपर्यंत भारताच्या पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये युक्रेनहून दिल्लीला परतताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून आले. त्या वेळी देखील पाऊण तास विमान पाकिस्तानच्या हद्दीत होते. सुरुवातीला विमान चित्रालमार्गे पाकिस्तानात गेले आणि नंतर अमृतसरच्या अगोदर इस्लामाबाद आणि लाहोरच्या हवाई नियंत्रण कक्षातून गेले. मोदींच्या विमानाने रात्री अकरा वाजता पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला आणि नंतर ४६ मिनिटांच्या प्रवासानंतर ते विमान भारतात दाखल झाले होते.

दरम्यान, २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. या हल्ल्यात निमलष्करी दलाचे ४४ जवान हुतात्मा झाले होते. मात्र पाकिस्तानने नागरी उड्डाणाला अनुमती दिली आणि महत्त्वाचे कॉरिडॉर खुले केले.

मार्सेलीमध्ये नवी वकिलात

फ्रान्समधील मार्सेली शहरात भारताच्या नव्या वकिलातीचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी मोदी आणि मॅक्रॉन यांनी ऐतिहासिक माझार्गेज स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT