Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : मोदी सरकार भ्रष्ट अदानीला वाचवत आहे : राहूल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानीच नातं काय?, अदानीच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कुणाचे? असा सवाल राहूल गांधींनी पत्रकार परिषदेतून केला.

Team Agrowon

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप भ्रष्ट व्यक्ती अदानीला वाचवत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केला. तसंच अदानी म्हणजे देश का? असा सवाल गांधींनी यावेळी केला.

काँग्रेसने आयोजित केलेल्या आज (ता.२५) पत्रकार परिषदेतून त्यांनी हा सवाल उपस्थित केला. आजच्या पत्रकार परिदतेतून राहूल गांधींचा रोष सगळा मोदी, अदानी यांच्यावर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानीचं नातं काय?, अदानीच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कुणाचे? असा सवाल राहूल गांधींनी पत्रकार परिषदेतून केला. मोदी आणि अदानी यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर या विषयावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

माझी खासदारकी रद्द केली तरी मी देशासाठी लढत राहणार. कारण या देशाने मला प्रेम दिलं. तसंच देशातील लोकशाहीवर सरकारकडून आक्रमण केलं जातंय, असं यावेळी गांधी म्हणाले.

देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मी लढत राहणार, मग मला सरकारने तुरूंगामध्ये टाकले तरी चालेल. तसंच माझा लोकसभा मतदार संघ असलेल्या वायनाडच्या जनतेला देखील पत्र लिहीणार आहे, असं राहूल गांधींनी नमूद केलं आहे.

काँग्रेस खासदार राजीनामे देणार?

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस कमिटीच्या उच्चस्तरीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एका खासदाराने सर्व खासदारांनी राजीनामे द्यावेत, अशी सूचना केली, परंतु त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.

मोदी आडनाव बदनामीच्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी भाष्य करण्यास नकार दिला. हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर मी काही प्रतिक्रिया देेणार नाही, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी अदानींना वाचवत असून मोदी हेच अदानी आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT