Ethanol Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : आधुनिकीकरण, इथेनॉल निर्मितीची कामे वेगाने

Ethanol Update : विस्तारीकरणासह आधुनिकीकरण व इथेनॉल निर्मितीची कामे वेगाने सुरू असून, ती लवकरच पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.

Team Agrowon

Sangli Ethanol News : विस्तारीकरणासह आधुनिकीकरण व इथेनॉल निर्मितीची कामे वेगाने सुरू असून, ती लवकरच पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.

चिखली (ता. शिराळा) येथील कारखान्यात गळीत हंगाम २०२३-२४ साठीच्या रोलरच्या पूजनप्रसंगी अध्यक्ष नाईक बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, की महाराष्ट्रात ‘विश्वास’चे नाव सक्षम कारखान्यांत घेतले जाते. अधुनिकतेची कास धरत टप्प्याटप्प्याने नियोजन करत विविध प्रकल्पांची उभारणी केली आहे. त्यामध्ये आसवणी, सहवीजनिर्मिती, कंपोस्ट खत, द्रवरूप जैविक खते, बियाणे, कार्बनडाय ऑक्साईड प्रकल्प आदींची उभारणी झाली आहे.

प्रतिदिन १२०० टन क्षमतेवरून आज ५००० हजार टन इतकी क्षमतेत वाढ झाली आहे. आता विस्तारीकरणासह आधुनिकीकरण तसेच इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. हे करत असताना कारखान्याचे अर्थकारण सांभाळले आहे.

बाबासाहेब पाटील म्हणाले, की दुर्गम व डोंगरी भागातील शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना न्याय देण्यासाठी विश्वास कारखान्याची उभारणी झाली.

कारखान्याने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. विविध उपपदार्थनिर्मिती करणारे प्रकल्प उभारले आहेत. व्यवस्थापक दीपक पाटील यांनी स्वागत केले.

या वेळी संचालक दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, हंबीरराव पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, सुहास घोडे-पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, यशवंत निकम, यशवंत दळवी, बिरुदेव आंबरे, सुकुमार पाटील, दत्तात्रय पाटील, आनंदा पाटील यांच्यासह विश्वास पाटील, कोंडिबा चौगुले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT