Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : भरपाईच्या मुद्द्यावरून मनसेने विमा कार्यालयाला ठोकले टाळे

Maharashtra Navnirman Sena Protest : पीक विम्याच्या भरपाईच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती असल्याने याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मारेगाव येथील पीकविमा कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले.

Team Agrowon

Yavatmal News : पीक विम्याच्या भरपाईच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती असल्याने याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मारेगाव येथील पीकविमा कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

शासनाकडून यंदा केवळ एक रुपया विमा हप्ता भरून पंतप्रधान पीक योजना राबविण्यात आली. परिणामी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले.

त्याची पूर्वसूचना तब्बल पाच लाखावर शेतकऱ्यांनी दिली. यातील साडेचार लाख शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण कंपनीकडून पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र यातील पात्र शेतकऱ्यांना तुटपुंजी दोन ते ४४ रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली.

याची दखल घेत मनसेच्या वतीने मारेगाव येथील रिलायन्स पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठत त्याला टाळे ठोकण्यात आले. शेतकऱ्यांच्या पिकाचे वस्तुनिष्ट सर्वेक्षण होण्यासाठी कृषी पदवीधर किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे आवश्‍यक होते.

मात्र विमा कंपनीने पंचनामे करण्यासाठी इतर शाखेचे पदवीधर तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांची नियुक्‍ती केली. त्यामुळेच जिल्ह्यात योजनेचा बोजवारा वाजल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या वेळी मनसेचे मारेगाव तालुका अध्यक्ष रूपेश ढेके, चांद बहादे, वसंता घोटेकार, उदय खिरटकर, शिवराज पेचे, संतोष राठोड, शेख नबी, फाल्गुन गोहोकार, मयूर घाटोळे, सूरज काकडे, धीरज बगवा उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT