Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहार उघड! धायगुडे यांना पदावरून हटवले

Quality Control Inspector Transfer : ई-मेलद्वारे झालेल्या नियमबाह्य नियुक्तीला न्यायाधिकरणाचा दणका बसला आहे. कृषी मंत्रालयाने आदेश दिल्यानुसार, गुणनियंत्रण निरीक्षक विलास धायगुडे यांना पदावरून हटवण्यात येणार आहे.

मनोज कापडे

Pune News: माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात ‘ई-मेल’द्वारे नियुक्ती केलेल्या गुणनियंत्रण निरीक्षकाला पदावर हटविण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहे.सातारा येथील खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी विलास बापूराव धायगुडे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. त्यांची नियुक्ती पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षातील ‘कृषी अधिकारी (गुणनियंत्रण)’ पदावर करण्यात आली होती.

नियम डावलून केवळ ई-मेलद्वारे मंत्रालयातून झालेली ही नियुक्ती चुकीची आहे, असा मुद्दा दुसरे गुणनियंत्रण अधिकारी धनंजय दिनकर पाटील यांनी उपस्थित केला होता. पाटील यांनी धायगुडे यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिकादेखील दाखल केली होती. या दाव्यात मॅटने धायगुडे यांची नियुक्ती अवैध असल्याचा निकाल १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी कृषी मंत्रालयातील अवर सचिव प्रशांत पिंगळे यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना सोमवारी (ता.२४) एक पत्र पाठवले आहे. ‘‘न्यायाधीकरणाने दिलेल्या आदेशानुसार धायगुडे यांना इतर पदावर नियुक्ती देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी नियुक्ती देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा,’’ असे या पत्रात सूचित करण्यात आले आहे.

आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षाच्या कृषी अधिकारीपदासाठी धनंजय दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर याच पदावर विलास धायगुडे यांना नियुक्त करण्यात आले. या नियुक्तीला पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने धायगुडे यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यानुसार निर्णयात सुधारणा करण्याची गरज आहे.

गैरप्रकार पुन्हा एकदा उघड

गुणनियंत्रण निरीक्षकपदावरून विलास धायगुडे यांना हटवून आता धनंजय पाटील यांची नियुक्ती पुण्याच्या गुणनियंत्रण निरीक्षकपदी होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागातील मोक्याची पदे बळकावण्यासाठी होत असलेला गैरप्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT