Sangli APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Market Committee : बाजार समिती निधीत गैरव्यवहार; दोषींवरील कारवाईस टाळटाळ

Team Agrowon

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१८-१९ व २०१९-२० कालावधीत निधीचा दुरुपयोग केलेला असताना शासकीय लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांनी फौजदारी दाखल केलेली नाही.

दोषींवर कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी लेखापरीक्षक पाटील यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ अन्वये कायदेशीर कारवाई का करू नये, अशी नोटीस सहकार विभागाचे अप्पर निबंधक ज्ञानदेव मुकणे यांनी बजावली आहे.

बाजार समितीच्या निधीच्या अपहाराबाबत संबंधितांविरुद्ध फौजदारी दाखल करण्यात आलेली नाही. तेव्हा लेखापरीक्षक पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ॲड. ओंकार वांगीकर आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली होती.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ आणि २०१९-२०२० मधील लेखापरीक्षणास पाटील यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्यांनी लेखापरीक्षण निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याने, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे उल्लंघन आहे. तसेच त्यांनी लेखापरीक्षण अहवाल जाणूनबुजून विलंबाने सादर केला.

बाजार समितीच्या कामांवर यापूर्वीच नागरिक, शेतकऱ्यांकडून निधीचा गैरवापर केल्याबद्दल आरोप केले जात आहेत. जमीन खरेदीतील अनियमितता, नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती आदी विषयांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

पाटील यांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात ‘भाग अ’मध्ये संस्थेत गंभीर दोष व अनियमितता असल्याचे नमूद केले. लेखापरीक्षक पाटील यांनी फौजदारी दाखल केली नाही. दोषींवर कारवाईस टाळाटाळप्रकरणी लेखापरीक्षक पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, अशी नोटीस सहकार विभागाचे अप्पर निबंधक मुकणे यांनी बजावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT