Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये ः कृषिमंत्री कोकाटे

Manikrao Kokate : खरीप हंगाम २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी २० ऑक्टोबर रोजी पीकविमा दाव्यासाठी ७२ तासांच्या आत नोंदविलेल्या तक्रारी विमा कंपनीने ग्राह्य धराव्यात.

Team Agrowon

Parbhani News : खरीप हंगाम २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी २० ऑक्टोबर रोजी पीकविमा दाव्यासाठी ७२ तासांच्या आत नोंदविलेल्या तक्रारी विमा कंपनीने ग्राह्य धराव्यात. त्रुटींच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे निर्देश कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी बुधवारी (ता. ४) मुंबई येथे परभणी जिल्ह्यातील पीकविमाप्रश्‍नी आयोजित बैठकीत दिले.

या बैठकीस आमदार राजेश विटेकर, कृषी सचिव, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनय आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, आयसीआयसी आय लोंबार्ड कंपनीचे उपाध्यक्ष मिहिर, शेतकरी एकनाथ साळवे, किशोर ढगे, अर्जुन साबळे, कल्याण साबळे, गोपीनाथ शिंदे आदी उपस्थित होते. आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २० ऑक्टोबर २०२४ रोजी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पीकनुकसानीच्या लेखी तक्रारी कंपनीकडे नोंदविल्या होत्या, परंतु पाऊस १९ तारखेला झाला होता असे कारण दाखवून कंपनीने त्या फेटाळल्या होत्या. पाऊस झाल्याच्या ७२ तासांच्या आत त्या नोंदविल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कंपनीला तक्रारी मान्य कराव्या लागतील.

शेतकऱ्यांच्या नावातील मिस मॅच, आधार कार्ड जोडणी नसणे, बँक खाते लिंक नसणे किंवा इतर तांत्रिक गोष्टीमुळे रद्द केलेल्या तक्रारी मान्य करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात, असे निर्देश कोकाटे यांनी दिले.

तक्रारी मान्य करण्यात येतील असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. राज्य व केंद्र शासनाकडील प्रलंबित विमा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग केल्यास काढणी पश्‍चात नुकसान बाबी अंतर्गत मंजूर पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT