Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : मंत्री हसन मुश्रीफांचा शक्तिपीठ महामार्गाबाबत 'यु टर्न', ज्यांना जमिनी द्यायच्या त्यांनी द्याव्यात

Devendra Fadanvis : रत्नागिरी - नागपूर या महामार्गाला समांतर नागपूर गोवा हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Oppose Farmers : नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात दंड थोपटणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यू टर्न घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायच्या असतील त्यांनी द्याव्यात, ज्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी तो करावा असे दुटप्पी वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला असलेला त्यांचा विरोध मवाळ होताना दिसत आहे.

रत्नागिरी - नागपूर या महामार्गाला समांतर नागपूर गोवा हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. दरम्यान या महामार्गाला सोलापूर, सांगली, कोल्हापूर सह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, "शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मी आजही आहे परंतु काही शेतकरी आपली भूमिका बदलत असल्याचे पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून महामार्गाला मोठा विरोध आहे परंतु आहे आता दोन गट तिथेच दिसत असल्याने ज्यांना जमीनी द्यायच्या आहेत त्यांनी द्यावा". असे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची नाराजी

शेतकऱ्यांचा विरोध डावलून राज्य सरकारने महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचे काम देखील आता हाती घेतले आहे. अशातच आता सुरुवातीला महामार्गाच्या विरोधात भूमिका घेणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र यू-टर्न घेत सोयीस्कर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला विरोध वाढू लागला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र या महामार्गाला आपला विरोध कायम असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी विरूद्ध सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७, तंबाखूजन्य पदार्थांवर कर; जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग 

Solar System: जळगावातील ५०० ग्रामपंचायतींवर सौर यंत्रणा

Dam Water Storage: ‘कसमादे’तील धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवारची १६ कोटींची कामे रद्द

Local Body Elections: सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ८,तर पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध

SCROLL FOR NEXT