Dada Bhuse Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon APMC Dispute : बाजार समितीतील वादात शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी

Dada Bhuse : व्यापारी व संचालकांची समिती गठीत करुन उत्पन्न वाढीबाबत एकत्रित निर्णय घ्या. गरज पडल्यास इतर बाजार समित्यांना भेटी देवून तेथील माहिती घ्या आदी सूचना श्री. भुसे यांनी सभापती व व्यापाऱ्यांतील वादावर पडदा पाडला.

Team Agrowon

Nashik News : मालेगाव : येथील बाजार समितीत सभापती तसेच व भाजीपाला व फळफळावळ विभागातील व्यापाऱ्यांमधील वादावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ५) महत्वपूर्ण बैठक झाली. व्यापारी व समितीच्या पदाधिकारी, संचालकांनी समन्वयाने काम करावे.

व्यापारी व संचालकांची समिती गठीत करुन उत्पन्न वाढीबाबत एकत्रित निर्णय घ्या. गरज पडल्यास इतर बाजार समित्यांना भेटी देवून तेथील माहिती घ्या आदी सूचना श्री. भुसे यांनी सभापती व व्यापाऱ्यांतील वादावर पडदा पाडला.

येथील बाजार समितीत सभापती चंद्रकांत शेवाळे व व्यापाऱ्यांमध्ये सोमवारी (ता. ३०) वाद निर्माण झाला होता. सभापती शेवाळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी करत बाजार बंद पुकारला होता. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी लिलावासाठी बाजार समितीचे पुस्तक घेण्यास नकार दिला.

व्यापाऱ्यांनी विषयांतर केले अशी भूमिका सभापतींनी मांडली होती. मुंबई येथे अधिवेशनात असतांना मंत्री भुसे यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क साधत लिलाव पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या संदर्भात बैठकीचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व संचालकांची बैठक झाली.

बाजार समितीच्या उत्पन्न वाढीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. समितीत कांदा, धान्य, मका मार्केटला बाजार समितीने दिलेले पुस्तक वापरले जाते. त्याच पध्दतीने भाजीपाला व फळफळावळ व्यापाऱ्यांनी समितीचे पुस्तक वापरावे अशी भूमिका संचालकांनी मांडली. व्यापाऱ्यांनी याला तीव्र विरोध केला.

कोणत्याही बाजार समितीत भाजीपाला मार्केटला पुस्तक दिले जात नाही असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर मंत्री भूसे यांनी व्यापारी व संचालक यांचे प्रत्येकी चार सदस्य असलेली समिती गठीत करण्यास सांगितले. समितीने एकत्रित दोघांना मान्य होईल असा तोडगा काढावा. समितीचे उत्पन्न वाढले पाहिजे. खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसला पाहिजे अशा सूचना केल्या.

मागील वादावर पडदा टाकण्यात आला. मंत्री भूसे यांनी सभापती शेवाळे यांना मोठ्यांचा आदर ठेवा. पदावर असताना जबाबदारीने बोला अशा सूचना केल्या. बैठकीला संचालक भिका कोतकर, विनोद चव्हाण, संजय घोडके, बंडु पगार, सुभाष पाटील, व्यापारी किशोर सोनवणे, दिलीप अभोणकर, नथुजी वाघ, प्रशांत मालपुरे, फकिरा शेख, नियाज शेख आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT