Sillod-Soygaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election : बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तारांचे एकहाती वर्चस्व

Sillod-Soygaon APMC Election Update : सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे.

त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पॅनेलचा पराभव देत सर्व अठरा जागांवर विजय मिळविला आहे.

रविवारी (ता. २८) झालेल्या मतदानाची टक्केवारी बघता निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीस शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी सर्वात पहिला निकाल हमाल व तोलारी मतदारसंघाचा घोषित झाला.

यामध्ये श्री. सत्तार यांच्या पॅनेलच्या उमेदवाराने मोठ्या लीडने विजय मिळविला. त्यानंतर मात्र सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघाची मतमोजणी संथगतीने सुरू होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास चित्र स्पष्ट होऊन सत्तारांच्या नेतृत्वातील पॅनेलने जोरदार मुसंडी मारित सर्व अठरा जागांवर विजय संपादन केल्यामुळे बाजार समितीची एकहाती सत्ता पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी काबीज केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी निकाल घोषित केला.

यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शेषराव उदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल घोषित होताच मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांसह मतमोजणीच्या स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विजयी उमेदवारांसह मंत्री सत्तार यांची मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT