Millet Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच

Kharif Season Update : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढू शकते. अनेकांनी कांदा व मका लागवड कमी केली आहे. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढून सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढू शकते. अनेकांनी कांदा व मका लागवड कमी केली आहे. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढून सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

बाजरीची पेरणी खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु कमी पावसाने अनेकांनी कांदा, मका व गहू लागवड कमी केली आहे. चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत आहेत. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढणार आहे.

केळी पट्ट्यातही बेवडसाठी बाजरी पेरणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागांत केळीची काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या बागांतही ठिबकवर बाजरीची पेरणी झाली आहे. तर रावेर, मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात केळी व इतर पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठी बाजरीची पेरणी झाली आहे.

काळ्या कसदार जमिनीत फक्त चार वेळेस बाजरीचे सिंचन करावे लागते. ठिबक असल्यास अधिकचे पाणी लागत नाही. बाजरीचे दरही २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे टिकून होते. चाऱ्यासही मागणी आहे. कारण यंदा कमी पाऊसमान असल्याने मका, गहू आदींची पेरणी घटली आहे. चाऱ्याचे दर वधारले आहेत.

बाजरीचा चारा दुधाळ पशुधनाला सकस मानला जातो. यामुळे बाजरी पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. बाजरी पेरणीस मागील महिन्यात सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात अनेकांनी आगाप पेरणी केली आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजरी पेरणीस वेग आला. पेरणी अद्यापही सुरू आहे. पेरणी पुढे सात ते आठ दिवस सुरू राहील, असेही संकेत आहेत.

अनेक शेतकरी थंड वातावरणात पेरणी टाळतात. कारण या काळात उगवणीवर परिणाम होतो, असे शेतकरी मानतात. यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यानंतर बाजरी पेरणीला आणखी काही दिवस वेग राहील, असेही सांगितले जात आहे.

जळगावात अधिकची पेरणी

बाजरीची सर्वाधिक सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात होईल, असा अंदाज आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर बाजरी असणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी होईल. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीत आघाडीवर आहे. परंतु या भागात पाऊस कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर अडचण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT