Bajara Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Bajara Sowing : बाजरीचे पेरणी क्षेत्र यंदा घटणार

Agriculture Sowing : खानदेशात यंदा पेरण्यांची गती चांगली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्या सुरू आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पेरण्यांची गती चांगली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्या सुरू आहेत. उडीद, मूग, मका, सोयाबीन, तूर, कापूस आदींची पेरणी वेळेत किंवा मुदतीत होत असल्याने बाजरीची पेरणी कमी होईल, असे दिसत आहे.

मागील हंगामात किंवा मागील वर्षी जून महिन्यात पावसाचा मोठा खंड होता. जुलैतही हवा तसा व वेळेत पाऊस नव्हता. यामुळे अनेक कोरडवाहू शेतीधारक उडीद, मूग, कापूस आदींची लागवड मुदतीत करू शकले नाहीत. पेरण्या लांबल्याने पुढे कमी कालावधी व कमी पावसात कुठले पीक घ्यावे, असा मुद्दा होता.

यातून बाजरीची पेरणी खानदेशात अनेकांनी केली होती. परंतु यंदा पाऊस वेळेत आला आहे. मागील वर्षी जूनमध्ये ४० टक्के क्षेत्रातही पेरण्या झाल्या नव्हत्या. यंदा मात्र या महिन्यात पेरण्या ८० टक्के क्षेत्रात पूर्ण होतील, असे दिसत आहे. पेरण्यांना गती आहे. उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. कापूस लागवडही आटोपत आली आहे. यामुळे बाजरी पेरणीची मोठी निकड किंवा या पर्यायाची निवड शेतकरी यंदा करणार नाहीत, अशीही स्थिती आहे.

मागील हंगामात बाजरीची पेरणी खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही पेरणी १० ते ११ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. बाजरीकडे नव्याने शेतकरी वळणार नाही. परंपरेनुसार धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे, जळगाावातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, नंदुरबारातील नंदुरबार भागात बाजरीची पेरणी होईल.

बाजरीची पेरणी अद्याप खानदेशात सुरू झालेली नाही. अनेकांनी पुढील महिन्यात पेरणीचे नियोजन केले आहे. सकस चारा व धान्य आणि कमी खर्च यासाठी बाजरीची पेरणी गिरणा, पांझरा नदीच्या पट्ट्यात केली जाते. कमी कालावधीच्या वाणांची निवड त्यासाठी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजरी पेरणीसंबंधीचे क्षेत्र पेरणीसाठी तयार आहे.

त्यात पूर्वमशागत करून घेतली आहे. खानदेशात जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करतील, असे दिसत आहे. तापी व अनेर पट्ट्यात काही शेतकरी केळी, पपईसाठी बेवड म्हणूनही खरिपातील बाजरीची पेरणी करतात. बाजरीची फक्त कणसे खुडून मळणी करून घेतात. चारा किंवा अवशेष तसेच जमिनीत गाडतात. यामुळे सेंद्रिय कर्ब कायम राखण्यास मदत होते. केळी पीक जोमात येते, असे शेतकरी मानतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT