Pulse Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Pulses Stock : ‘डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल-गोदाम मालकांनी साह्य करावे’

सोलापूर जिल्ह्यात विविध डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी डाळ मिल मालक, परवानाधारक गोदाममालक, डाळ मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात विविध डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी डाळ मिल मालक, परवानाधारक गोदाममालक, डाळ मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे केले.

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमीत शिंदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांच्यासह शहरातील डाळ मिलमालक, जिल्ह्यातील सर्व डाळ मिल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल्स व गोदामांची तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकांनी जिल्ह्यातील सर्व डाळ मिल्स व गोदामे यांची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, पाहणीस आलेल्या या पथकांना आवक-जावक रजिस्टर व इतर सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

डाळींची आवक व जावक याचा हिशेब द्यावा, संकेतस्थळावर सत्य माहिती भरावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केल्या. या वेळी डाळ मिलमालकांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याची हमी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT