Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : साडेतीन महिन्यांपासून दुधाचे अनुदान रखडले

Milk Rate : सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने ऑक्टोबरपासून जिल्हा दूध विकास विभागाने दूध अनुदानाचे प्रस्तावच घेतले नसल्याने दूध अनुदान मिळणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे.

नवनाथ भेके

Pune News : सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत आलेल्या प्रस्तावांचे १७९ कोटी दिले; परंतु त्यानंतर दुधाला जाहीर केलेले प्रतिलिटर सात रुपये अनुदान १ ऑक्टोबर ते १५ जानेवारी या साडेतीन महिन्यांपासून रखडले आहे.

सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने ऑक्टोबरपासून जिल्हा दूध विकास विभागाने दूध अनुदानाचे प्रस्तावच घेतले नसल्याने दूध अनुदान मिळणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे. अशामध्ये जनावरांना आहारात रोज लागणारा भुसा ५० किलो बॅगमागे २०० रुपयांनी महागल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या १२ जुलै २०२४च्या निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, या योजनेत पुणे जिल्ह्यातील ११८ सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे.

१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्या वेळी दुधाला फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफसाठी ३० रुपये दर होता. या तीन महिन्यांचे १७९ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे.

त्यामध्येही अनेक दूध उत्पादक शेतकरी वंचित आहेत. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिलिटर दोन रुपये वाढ करून सात रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफसाठी २८ रुपये दूध दर करण्यात आला होता. मात्र, हे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही.

सरकारने जुलै २०२४ पासून दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान टप्प्याटप्प्याने आमच्या दूध उत्पादकांना मिळाले. परंतु १ ऑक्टोबर २०२४ पासून दुधाच्या अनुदानात वाढ करून प्रतिलिटर सात रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु गेल्या साडेतीन महिन्यांचे अनुदान आम्हाला मिळाले नाही. आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे.
- बाळासाहेब टेमगिरे, अध्यक्ष, शिवशंकर दूध संस्था, थोरांदळे, (ता. आंबेगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT